कहाणी
कहाणी
तुझ्या मिठीत वेळ कसा जातो
हे न उलघडणार कोडं आहे
वेळेलाही असच थांबावल जावं
हे माझ्या मनातल वेड आहे
तुझ्या बोटांचा नाजुक स्पर्श
रेंगाळत राहू दे माझ्या ओठांवर
निखळ खळी उमलते गोड
आपसुक स्पर्शलेल्या गालावर
मिठीत होते जाणिव मजला
पुन्हा नव्याने प्रेमाची
रोम रोम जागे होती
कहाणी आपल्या दोघांची

