केळवण...
केळवण...
आला जुळून योग ,
गाठी स्वर्गातून बांधून,
अवतरले स्वर्गाचे भोग,
यालाच म्हणतात राजयोग...
एक राजकुमार राजबिंडा,
आवडली राजकुमारी नाजूक,
सुपारी फुटली लग्नाची ,
स्वप्न फुलले डोळ्यात साजूक...
आयाबाया लागल्या कामाला,
नव्या जोडप्याच्या केळवणाला,
आंबट गोड तिखट खारे पदार्थ,
जणु हाच आनंद जीवनाला ...
थोडस बिनसले समजून घ्या,
चुकले माकले माफ करा,
नवी सुरवात ही आयुष्याची,
एकमेकांचा सुखदुःखात हात धरा ...
