STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

कधीतरी असंही जगावं

कधीतरी असंही जगावं

1 min
261

धागे आयुष्याचे वेगवेगळे विणले 

जातात सुखदुःखांच्या क्षणात  

आयुष्य हे क्षणभंगुर असत म्हणून

मनमुराद जगायचं असतं जगतांना या जगात


 विसरून सारे क्लेश मनाचे

 एकांतात फिरावे या संध पाण्यात  

पोकळ भाव नैराश्याचे जेव्हा असते 

व्यर्थ विचार मनात  


सर्व गुण अंगी रहावे 

गर्व,अहंकार न जपावा स्वतात 

मोह बाळगावा तरी कशाला 

आज आहे उद्या नसेन या विश्वात


 आयुष्यात असतात चढ-उतार  

यश अपयशाच्या अनुभवातून बुद्धीलाही

मिळते मग धार येथे रडून केलेली सुरुवात

इथेच रडूनच झालेला अंत 

आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास शांत 😊  


आयुष्यात अनेक वळण येतात

चांगले वाईट अनुभव येतात त्या अनुभवातून शिकावे, 

ऐकावा पक्षांचा किलबिलाट, बघावा पाखरांचा थवा,

हिरव्या पानात दडलेली पिवळसर कळी 

सोनेरी उन्हाच्या गालावरची खळी

अनुभवा कधी गार गार वारा 

सुखदुःखाचे स्मरण करावे पाहुनी प्रकाशाचा, निसर्गाचा खेळ 

जाईल निघुन चुटकी

 सरस आलेली ही क्लेशदायक वेळ😔  


उघडावे जुने अल्बम आठवाव्या

त्या आठवणी 

किती सुंदर होते सुंदर ते दिवस 

आपल्या बालपणी ☺️


पक्षासमान उडावं आकाशात मुक्त पसरावं 

सुखदुःख विसरून साऱ्यांना घेत आपल्यात सामावून 

 तारयांसारखं कधी चमकावं  

करून चिंता उद्याची आज रडत न बसता 

 तोडून बांध दुःखाचा पावसा सारखं बेफिकीर होऊन कधीतरी बरसावं

राग येतो खूपदा पण द्वेषाला

 खत-पाणी न घालता

 एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःमधल्या स्वतःला जिंकाव 

कधीतरी असंही जगून बघावं...😊🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational