कधी-कधी
कधी-कधी
आयुष्याच्या या खडतर प्रवासला
त्रस्त व्हायचं नसतं कधी
प्रत्येक प्रवासात अचूक
मार्ग शोधून त्याच मार्गाने आनंदाने
सफर करायची असते कधी-कधी...
आयुष्याची प्रत्येक पायवाट
सुखमयचं असेल असं नसतं कधी
दु:खाच्या काट्यातुन ही
सुखाची फुलं ही आपणच
फुलवायची असतात कधी-कधी...
आयुष्य नुसतंचं जगायचंय
म्हणुन जगायचं नसतं कधी
या जगण्यातून ही खूप काही
शिकायचं असतं कधी-कधी...
