कधी कधी
कधी कधी
कधी कधी असे वाटतं
कुठे तरी दूर निघून जावं.
बेधुंद पाखरा सारखे
डोक्यावरच औझे इथेच
टाकूनी उडून जावे.
न कसलाच विचार ,न कुणाची काळजी
माझ्या मनाची मीच एकटी .
कधी कधी असे वाटतं
हरवून जावं त्या स्वप्नांचा जगात
मनात साठवले क्षण पुन्हा एकदा जगून बघावे.
न कशाचा लोभ न कसलीच मनिषा
आता फक्त अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची आशा
जे राहीले ते पून्हा करून पाहण्याची इच्छा.
कधी कधी स्वतःला पण आठवून बघावे
आनंदाच्या लाटांवर झुलत जावे.
