असावा असा कोणी तरी....
असावा असा कोणी तरी....
आभाळ एवढ प्रेम नको.
नको ती फुलं चंद्र तारे.
फक्त हातांत हात असावा तुझा.
जेव्हा मी असावी एकटी.
माझ्या दोळयांत तुझ्या.
आनंदाचे अश्रू असावे.
तुझ्या डोळ्यांत मी पुन्हा मलाच भेटावे.
माझ्या पावलांसोबत तुझ्या
पावलांची साथ असावी.
तू सोबती असताना क्षणभर.
जगालाही विसरून जावे.
आकाशात रंगाची उधळण असावी.
सोनेरी स्वप्नांची पायवाट दिसावी.
कुठे न कुठे असावा असा कोणी तरी.

