आयुष्याची वाटचाल
आयुष्याची वाटचाल
आयुष्याची वाट ही,
नकळत कुठे चालली
विविध माणंस भेटली,
प्रत्येकाची गोष्ट वेगळीच.
कधी हसलो तर कधी रडलो
किती तरी वळणे आली आयुष्यात,
प्रतेेक वळण काही तरी शिकवून गेल
सुखाची नदी पाहिली,
दुःखाचे डोंगर पाहिले
खडतर रस्त्यावरुन प्रवास केला,
आनंदाचा झरा पाहिला,
तरी ही वाट संपत नाही
आयुष्याची वाट ही नकळत कुठे चालली
