कसा वेडा हा पाऊस ...
कसा वेडा हा पाऊस ...
मेघ दाटले आभाळी
झुळझुळ वाहे वारे माझा अंगणी
चाहूल लागली तुझ्या येण्याची
सुगंध मातीचा सांगून जाई
रिमझिम ह्या पाऊस धारा साथ घाली मला.
प्रेम बहरुन येते आता भेटी लागली जीवा.
कधी मनातल्यामनात हसणारा ,
तर कधी गालांवरून हलकासा निसटलेला
बेधुंद नाचणार, कधी चिखलात खेळणारा
प्रेमात भिजणारा तर कधी इंद्रधनुष्याचे तीर सोडणारा
थेंबा थेंबाची गोष्ट ही वेगळी.
ओला स्पर्श हा तुझा
थंड गार वारा सांगून जाई ...

