अशी आली ही दिवाळी
अशी आली ही दिवाळी
पहाट दळवळी सुगंध उटण्यांत,
सप्त सुरांनी सजली सकाळ.
टिपक्याची रांगोळी अंगणात
कंदील दिव्याचा झगमगाट.
अशी आली ही दिवाळी.
तिखट गोड फराळ सजला ताटांत
गोडवा त्याचा घरा घरात.
दूर निघून गेलेली नाती जवळ आणते,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येते
अशी आली ही दिवाळी.
सुखाचे दिप उजळून देते
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरून जाते.
जीवनातील अंधकार दूर करते.
अशी आनंद घेऊन आली ही दिवाळी.
