क्षणभर तुला पाहता
क्षणभर तुला पाहता
क्षणभर तुला पाहता
मनात उमटले प्रेम हे
डोळ्यांत तुझ्या दिसले,लखलखते चांदणे.
चार पावलांची साथ तुझी.
आज का पडू लागली स्वप्न उद्याची.
कळत नकळत बांधले धागे तू
गुंतलो मी आता तुझ्यात,
न राहीलो आता माझ्यात गं.
सावरू मी कसा आता स्वतःला गं
राहू दे रूप हे तुझे आता स्मरणात गं.
संपले स्वप्न माझे हे तरीही.
आता कसा विसरू मी तुला गं
मनात फक्त तु आणि फक्त तूच राहून गेलीस
तुझ्यात मी नसलो तरीही, मी तुझाच होऊन गेलो गं

