STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

5  

Smita Doshi

Inspirational

कौल जनाचा

कौल जनाचा

1 min
255

तख्तावर कोण येणार,याचं मला काय

खायला पोटभर मिळालं म्हणजे मी खुश हाय

तुला मत देईन,तुला बी मत देईन

पण दोघांकडूनही मी वसुली करून घेईन


  माझं मत आहे मोलाचं

नाही ते कवडी मोलाचं

तुला निवडून यायचंय,त्यासाठी माझं मत मिळवायचंय

तर मग प्रामाणिक पणानं हात जोडायचा


निवडून आल्या वर दिल्या वचनाला जागायचंय

नाहीतर उद्या तुझ्या जागी मी असेन, माझ्याजागी तू

पळता भूई थोडी करीन,याचा विचार कर तू

आठव त्याग,आठव बलिदान त्या हुतात्म्यांचं


अरे,कशाचीही अपेक्षा न करता, दिलं दान प्राणाचं

भारतमातेला स्वतंत्र करायचं ,हेच मनानं धारलं

त्यासाठी घरदार,पैसा नाही कशाला गोंजारलं

तूही हो आदर्श हुतात्मा,घे सलाम आमचा

सुखावेल तुझा आत्मा,योग्य कौल येईल जनमताचा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational