काय सांगू
काय सांगू
काय सांगू तुझी
किती वाट पाहिली
तरीही काही इच्छा
अधुरीच राहिली || 0 ||
तू नव्हतीस तेंव्हा
तुझी इच्छा होती
तुझ्यासाठी नेहमी
सदिच्छा होती
किती तुझ्या विरहात
वेदना मी साहिली
तरीही काही इच्छा
अधुरीच राहिली || 1 ||
स्वप्न रंगवली
तुझ्या मिलनाची
आशा होती तीव्र
तुझ्या आगमनाची
इच्छापुरतीला मी
तिलांजली वाहिली
तरीही काही इच्छा
अधुरीच राहिली || 2 ||