STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance Fantasy

3  

Abasaheb Mhaske

Romance Fantasy

काय फरक आहे ग तुझ्यात

काय फरक आहे ग तुझ्यात

1 min
13.7K


काय फरक आहे ग तुझ्यात नि तिच्यात ?

तू ही छळतेस... तशी ती ही ...छळतेच ना ...

फरक फक्त एवढाच तू मूर्त स्वरूप, कविता अमूर्त 

अस्तिवात मात्र दोघीचही माझ्यासाठी सारखंच .

तू आणि कविता माझ्यालेखी तितक्याच  

रोमरोमात भिनलेल्या , हव्यहाव्याशा पण ...

तू ही वागतेस आपल्या मर्जीने तशी ती ही 

छळतात दोघीही तू असताना, ती नसताना ..

कधी कधी वाटते तू आणि कविता वेगळ्या नाहीसंच  

फरक एवंढाच तू बोलकी बाहुली, ती छळणारी सावली  

ती कविता नव्हतीच मुळी, ती तर होती तुझीच प्रतिमा ...

आत्म्याविना तडफडणारी जणू असह्य काया ...

तू म्हणजे प्रतिभा कविता म्हणजे प्रतिमा 

तू आणि कविता वेगळी असूच शकत नाही 

उध्वस्त भावनांची स्पंदने, ती आक्रन्दने 

तुझ्या भोवविभोर आरोळ्या ,कवितेच्या चारोळ्या  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance