STORYMIRROR

Umesh Salunke

Romance

3  

Umesh Salunke

Romance

काय आहे आयुष्यात

काय आहे आयुष्यात

1 min
11.7K

तुला भेटायचा कित्ती विचार केलाय गं

माझं मन तुझ्याशिवाय नाही राहात गं

काय आहे आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं गं......!


फोनवर बोलून वैतागून गेली गं

बाहेरची हवा जास्त छान वाटती गं

सारखी चिडचिड माझ्यावर करती गं

काय आहे आयुष्यात तुला सोडून वेगळं गं.....!


किती दिवस झाले एकमेकांना पाहिलं नाही गं

मनात सारखं असं होतंय कधी तुला मिठी मारील गं

खूप काही आठवणी येतात गं

तुझ्याशिवाय काय आहे आयुष्यात गं.....!


बरेच दिवस लोटून गेले गं

रस्त्यावरून सगळीकडे शुकशुकाट आहे गं

नजरेला नजर भिडली नाही गं

हाताचा स्पर्श हाताला जाणवत नाही गं

तुझ्या बोलण्याशिवाय काय आहे आयुष्यात गं....!


अजून किती दिवस घरी बसायचं आहे गं

खरंच तुला कधी भेटेल असं मला होतंय गं

तुझ्या बाहुपाशात रंगत मला परत आणायची गं

आनंदाचे क्षण बघण्यासाठी काय आहे आयुष्यात गं.....!


निसर्गाच्या कुशीत कधी रमायचं गं

नदीकिनारी एकांत तुझ्याशी गाठायचं गं

तुझ्याशी मंद वाऱ्यासोबत झुळूक होऊन जायचं गं

तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसरी सकाळ वाटतीय गं

तुझ्याशिवाय काय आहे प्रेम आयुष्यात गं......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance