काव्य
काव्य
टेबलवर विस्कटलेला प्रपंच
रात्री बारानंतर हातरली काव्याची सतरंज
दोन बाय तीनमध्ये मनाची दौड.
फेटलेल्या शिगारेटला शब्दांची ओढ
फाटक्या पानावर नक्षत्र मोड
शीर्षक पाला पाचूळा
शब्दांना खोल दर्यातून केले गोळा.
वेचली फुले जी जमीनवर
काही चमकत आकाश मात्यावर
भेटायला जातोय घेऊन रिकामी झोळा.
न विझता शिगारेट पायाने तुडवली
बंधन तोडणाऱ्या काव्यान झोपच उडवली.
शब्द चार त्या कोऱ्या पानावर रेखाटलेली
मृत शरीराला लाकडांची गरज कसली
जळणाऱ्या आपल्यांची कमी कसली
उदास मन होत
अंत हा सुरवात,
काव्य झेप घेई डोळ्यात.
काव्य जन्म होण्याआधी झोपुन जात
