STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational

4  

Sunny Adekar

Inspirational

काव्य लहर

काव्य लहर

1 min
300

कधी बहरत येते

कधी लहरत येते

कधी अंतर मनातून येते

कधी स्फूर्ती देत येते ।।1।।


कधी मनाला साद घालत येते

कधी न आठवुन ती आठवत येते

कधी शब्दाची धार होत येते

ओठांत मनी हास्य फुलवत येते ।।२।।


गंभीर शब्दांत व्यक्त होत येते

कधी हास्याची कारंजी ऊडवत येते

मनाची भावना व्यक्त होत येते

अशी मनी काव्य लहर बहरत येते ।।3।।


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Inspirational