कातरवेळ
कातरवेळ
खिन्न दिवस सरता, का रात रडत येते...
देऊन काळोख उराशी, घट्ट मला बिलगते...
नाती सारी तुटलेली, नव्याने रे शिवते...
का पुन्हा पुन्हा त्या , नात्याला गाठ पडते..
दिस जातो कसातरी, रात चांदणी सवे रडते..
का अशी वियोगाची घटना अघटीत घडते...
सावरु कितीदा, कळेना मन का हे झुरते...
त्यास कुठे पर्वा माझी, नित सदा मी मरते...
होळी झाली जिंदगीची,मन मारून जगते...
भगवंताकडे रोज, ईच्छा मरण मी मागते....
का ही उदास कातरवेळ, उगा मला चिडविते.
कुणी न तुझ्या सवे येथे, हेच जणु सुचविते...
नाही कसली तक्रार देवा, कुणा न दोष देते..
स्पष्टीकरण नको आता, मीच माघार घेते....
इथे स्वार्थ टपकतो,मी वेडी उगी आस धरते.
विश्वासघात होऊन , नित तोंडघशी पडते...
विखुरली अवघी नाती, शिवण्या यत्न करते..
एकसंध जोडण्या, भावना नात्यात गुंफिते...
नाही कुणा दुखावून, जगणे मला रूचते...
पडता गरज कुणा, मी दानशूर कर्ण ही बनते.
नाही तमा कुणास, मी काय नी किती भोगते.
इथे का प्रत्येक वळण ,साथ माझी सोडीते...
भयंकर यातना, वेदना,साऱ्यांपासून लपविते.
तरीहि निष्ठुर नियती, मला नित छळून जाते.
ते जीर्ण, भग्न हृदय, एकांतात मला विचारते.
का असे असह्य जगणे, माझ्या वाट्यास येते.
रोज ही कातरवेळ, मन कातर करण्या येते.
आयुष्यासवे , काळीज ही पोखरून जाते...
जन्म हा एकलाच तुझा, सांगण्या अंगणी येते
जाशील ही एकलीच तु, सांगूनी ती परतते...
नको करुस दैना जीवाची, नजरेने बोलिते...
अनित्य जग हे, बुध्दाची शिकवण सांगीते...
