STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

4  

Vijay Sanap

Inspirational

कामगाराचं जीनं

कामगाराचं जीनं

1 min
759


।। कामगाराचं जीनं ।।


गावा पडला दुष्काळ

कणगित नाही दाणां

हाता मिळेना रे काम

नाही खिशामध्ये आणां ।।


पोटासाठी गावं सोडून

आलो बाबा शहरात

महिण्याचा आर्धा पगार

जातो भाड्याच्या घरात ।।


शहरातं महागाई

कसं भरावं रे पोट

काम शोधता शोधता

सुकून गेले रे ओठ ।।


सण येता दिवाळीचा

धरे महागाई जोर

नव्हे बायकोला साडी

कपड्या विना रडे पोर ।।


लय झालं आवघड

ह्या कामगाराचं जीनं

या महागाड्या शहरात

नाही लागत रे मनं ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational