कालपर्यंत
कालपर्यंत
कालपर्यंत तु सोबत होता,
आज का हाती हात धरला,
कालपर्यंत तु निर्व्याज होता,
आज का हिसकायची भाषा बोलला...
कालपर्यंत तु आधार होता,
आज का विश्वास जाळला,
काल पर्यंत तु मित्र होता,
आज का? हा अट्टाहास धरला...
कालपर्यंत मुक्त भ्रमर होता,
आज का? बंधनात बांधला,
कालपर्यंत दुतर्फी होता,
आज का? एकतर्फी झाला...
मला तु हवा हवासा होता,
आज का? नकोसा झाला,
नात्यांचा थाट असाच होता,
आज का? स्वार्थी झाला...
होत्याचं नव्हते होता ,
प्रेमावरचा विश्वास उडाला...
