STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

काळजी धरतीची ...

काळजी धरतीची ...

1 min
371

अंधाऱ्या रात्री
 चांदणे ही लपलेली
 वाट एकटीच मात्र
 आकसून थरारलेली ...

 टाकीत उसाचे रात्र
 स्वतःशीच स्फुंदलेली
 भरलेल्या ढगातूनी
काळजी धरतीची अन्
छाती आभाळाची फाटलेली ...

 पानाची सळसळ
 जरा आता थांबलेली
 वावटळ होती कदाचित
 नासधूस करून गेलेली...

 कोरडा ऋतू सूर्याचा
 वळवाच्या पावसा संग गार बरसली
 भयंकर अनुभव घेऊन धरती
 गोष्ट बळीची अधुरी राहिलेली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract