कालची अन् आजची ती
कालची अन् आजची ती
कालची ती आजची ती
सहजच बदलली नाही
पुरूषप्रधान विचारधारेतही
तिने अस्तित्व सोडले नाही
नांगर धरून हातात
संसार तिने होता थाटला
आज लेखनी अन् तंत्रज्ञानाने
संसार तिने आहे रेखाटला
पुर्वी सासरी अन् माहेर
दोहोंना कौशल्याने सांभाळले
त्यासह नोकरी अन् व्यवहारही
आज तीने कौशल्याने सांभाळले
हिरकणी अन् जिजाऊंचे
संस्कार ती विसरली नाही
विज्ञानासह तीने जबाबदारीने
साकारली आहे भारतीय आई
नेसून साडी, सावरत पदर
सावरलाय तिने संसार
आज ओलांडून उंबरठा
झालीय ती घराचा आधार
