STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

काल भ्रमण

काल भ्रमण

1 min
165



किती सुखाचे अन किती दु:खाचे

दिवस भरभर निघूनी गेले

कालभ्रमण तू थांबणार नाही

मग वेचू कश्याला क्षण दु:खातले ।।

संकल्पाची नित गुज मनी

ध्येयाचे हे मनकवडे मनी भरे

कोण आपला कोण दुसरा

मनी आणु कश्याला दुजाभावरे ।।

नियम साधुनी धुणी रमवूनी

आत्मविश्वास हा पांघरूनी

काय कमविले काय हरविले

मग शोध कश्याला घेवू अंतरमनी ।।

प्रतिभेच्या या वेलीवरती

राग रंग निखळे उल्हासूनी

त्वरीत पोचण्या घाई नकोशी

मग चढु कश्याला सरसरूनी ।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational