STORYMIRROR

Sanjay Gurav

Tragedy

3  

Sanjay Gurav

Tragedy

का...?

का...?

1 min
222

सुटताना एक एक नीसर गाठ

वाहायलाच हवा का अश्रूंचा पाट ?


विस्कटताना अवघा तो थाटमाट

आप्तांनीच घालावा का सारा घाट ?


फुटताना साठलेल्या अमृताचा माठ

वर्मावर बसावा का खडा नेमका राठ?


जुडी बांधताना उकलांची सत्राशे साठ

नेमकी का सुटावी चापून मारलेली गाठ?


धुंडाळण्या नवे निवडता दिशाही आठ

चुकतेच का नकाशा सापडूनही पायवाट?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy