STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Drama

3  

Asmita prashant Pushpanjali

Drama

का तिच्याच माथी लेबल

का तिच्याच माथी लेबल

1 min
13.9K


का तिच्याच माथी लेबल।

तिने जगावे कायम।

नात्याची चौकट, बंधनात।


का तिच्याच उरी धळधळ

तिने सोसावे कायम।

संस्काराचे भार, डोयी जड।


का तिच्याच डोई भार।

तिने पेलावे कायम।

रिस्त्याचे तराजू, दोन्हीकडील।


का तिच्याच नावी गुन्हा

तोडले घर, फोडले नाते

कोंडी तिच्याच जिवाची।


का तिच्याच माथी कलंक

अब्रू, इज्जतीचे लांछन,

भाव भावनांचे दमन कायम।


का तिच्याच माथी लेबल।

का तिच्याच माथी लेबल।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama