का? दृष्टीकोन हा...
का? दृष्टीकोन हा...
का? दृष्टीकोन हा,
ऐवढा संक्षिप्त झाला,
हा परिघ होता मोठा ,
तरी त्रिज्येतच मर्यादीत राहिला...
विचारांची संज्ञा स्पष्ट होता,
तेव्हा अविर्भाव जागला,
सुज्ञ स्वप्नांच्या पलीकडले,
तिथे क्षितीजावर कोरला ...
कळले का तुला,
अज्ञानाने का भारावला,
जे पाहतो ते सत्य नाही,
भाव सत्य कुठेतरी हरवला...
जुंपूनी पिढ्या पिढयांची बंधने,
हार गळ्यात तोच घातला ,
बदला पेहराव जुना ,
रणसंग्रामी बिगुल वाजला ...