ज्योतिर्गमय
ज्योतिर्गमय
नेहमीच सण येतो आणि सोहळे देऊन जातो
यावेळी वेगळे काही, सणालाच देऊन जावू
रस्त्यावरच्या आर्जवांना आणि नजरांतल्या मागण्यांना
आजतरी त्यांना, तृप्ततेचे दान देवू
भुकेले जीव काही, फिरती दिशा दाही
फराळाची शिदोरी अन् घासातला घास देवू
कैक जीव एकटे, उदास त्यांचे घरटे
रांगोळीत त्यांच्याही सुखस्वप्नांचे रंग भरु
तमसो मा ज्योतिर्गमय, सर्वांसाठी प्रार्थू
ज्यांची दीवाळी तिमिरात बुडाली, त्यांचे घरी दीप लावू
