STORYMIRROR

Pratik Kamble

Inspirational Others

2  

Pratik Kamble

Inspirational Others

ज्योत क्रांतिची

ज्योत क्रांतिची

1 min
15K


ज्योत क्रांतीची पेटवून

शिक्षणाचा महत्त्व समजवले

शिक्षणाचा अधिकार देऊन

स्त्रियांना क्रांतीचे धडे शिकवले

शिक्षणाचा अधिकार नव्हता

तो अधिकार पटवून त्यांना दिला

जीवन क्रांतीचे धडे देत

स्त्रियांचा पाया मजबूत केला

शेणाचे गोळे फेकले गेले तरीही

सवित्रीबाई फुले मागे सरले नाही

स्त्री शिक्षणाच्या लढ्यात त्यांनी

शेवट पर्यंत हार मानली नाही

शेणाच्या गोळ्यांचा मार खाऊन

जिद्दीने लढला शिक्षणाचा लढा

शिक्षणाची मशाल सदा पेटवत

शिकवला क्रांतिकारक धडा

शिक्षणाशी बांधली गेली होती 

सावित्रीबाई यांची अतुट गाठ

शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी 

होती सावित्रीबाई उसळती लाट


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational