जय गजानन
जय गजानन
हे गजानन, गौरी नंदना, पुरवा मम कामना |
सत्य, शिव, अन सौंदर्याची व्हावी आराधना ||
पावित्र्याची, चैतन्याची, तू मंगलमूर्ती |
दुःख निवारुनी , सुख द्यावया, येशी या जगती ||
चिंतामणी तू, तुझ्या चिंतने, विघ्ने दूर हरती |
तुझ्या कृपेने लाभे मजला, रचनेची स्फूर्ती ||
सकल गुणांचा गुणाधीश तू , कलांचा अधिपती |
वेदविद्या, सकल शास्त्रही तुज पुढती नमिती ||
काव्यारंभी कृतज्ञतेने, करिते तुज वंदना |
शांती, समता, बंधुत्वाची, लाभावी मज प्रेरणा ||
रिद्धीसिद्धीच्या वरा, दयाळा, ओवाळून आरती |
प्रार्थितसे तुजला मी गणेशा, करी सकल कामनापूर्ती॥
