STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

4  

Vijay Sanap

Inspirational

जुनं सारं गेलं

जुनं सारं गेलं

1 min
568


।। जुनं सारं गेलं ।।

जुनं सारं गेलं आता

नवं नवं आलं ।।धृ।।


आई गेली बाबा गेले

आले डॅडी मम्मी

कानामध्ये मोबाईल

गाऊ लागली गाणी

नवऱ्यानं बायकोचं

कौतुक केलं .....।।


साडी गेली चोळी गेली

आलं आता गाऊन

संध्याकाळी नवरा येतो

रोज दारू पिऊन

बाहेरचं भूत कसं

घरामध्ये आलं ....।।


काजळ गेलं कुंकू गेलं

आली नवी टिकली '

बाईची हो झाली मॅडम

सौंदर्याला मुकली

वय झालं तरी तिच्या

ध्यानी नाही आलं .....।।


मोबाईलमुळे गाव आता

झाला सारा वेडा

कोणालाही येत नाही

उजळणीचा पाढा

व्हॉट्सअॅपमध्ये याचं

मन रमून गेलं ......।।


सरपण गेलं चूल गेली

आली गॅस शेगडी

चालता बोलता याची

बंद पडू लागे नाडी

बुढ्ढा होण्या आधी

याचं हात पाय गेलं .....।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational