जुळले ऋणानुबंध
जुळले ऋणानुबंध
येता जाता तुला पाहे
मन माझे वेडेपिसे
उधाण मनी तो वारा
प्रेम लागिर हो दिसे
बघे हसून सुख ते
ऋणानुबंधास वाटे
तुझे माझे नाते असे
हवेहवेसे हो वाटे
राधेश्याम माने जग
मन मंदिर तू वसे
प्रेम प्याला सखे तुझा
तूच माझी हिर जसे
वाट बघतो नयनीं
मृगजळ मला भासे
मोर हिरणी तू दिसे
जिथं तिथं मला भासे
सखे काळजात माझ्या
काटा रुतला प्रेमाचा
नको करु दूर मला
देना आधार प्रेमाचा

