जतन
जतन
लहानपण म्हणजे मातीचा गोळा
वळवावा तसाच वळत राहतो
स्वप्ने वेगाने धावण्याची दिली
तर वायूवेगाने धावत राहतो
संस्कार नेहमीच घडवतात
अविश्वसनीय असे बदल
जतन करण्याची गरज आहे
नका करू त्याची अदलाबदल
जतन केल्याने राहतात
अवशेष जुन्या संस्कारांचे
पुन्हा पुन्हा अनुभवता येतात
परिणाम घडलेल्या बदलांचे
