जरा बदलून बघ...
जरा बदलून बघ...
जरा बदलून बघ
जीवनाचं हे चाक,
आपल्या कामासाठी
मनापासून तू वाक...
जरा बदलून बघ
तुझा हा स्वभाव,
तरच इतरांकडून
मिळेल तुला मानभाव..
जरा बदलून बघ
आपलं विक्षिप्त वागणं,
तरच मिळेल तुला
तुझ्या मनाचं मागणं...
जरा बदलून बघ
दैनंदिन कामाची निवड,
तरच मिळेल तुला
संभाव्य कामासाठी आवड..
