STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

2  

Abasaheb Mhaske

Tragedy

जोवर असेल ...

जोवर असेल ...

1 min
14K


जोवर असेल ...

जनता भोळी, दूधखुळी 

प्रशासक मुजोर, नेते संधीसाधू 

स्वप्नांची होळी होणारच


जोवर असेल

अंध भक्ताची फौज 

बुवा, बाबाची मौज 

अज्ञानी फसवला जाणारच


जोवर असेल

इमान विकणारे 

विकत घेणारे 

शेतकरी नागवला जाणारच


जोवर असेल

स्वार्थी , घरभेदी , भ्रष्टाचारी ..

मानवजातीत शोषक अन शोषित 

कुपोषित बालक मरणारच


जोवर असेल

सुगीचे दिवस 

हुरड्यातले पीक झक्कास 

पक्षीहि डल्ला मरणारच. ..


जोवर असेल... 

आपल्याच तंद्रीत मासे 

नदीकाठी संधीसाधू बगळे 

फासही गळी लागणारच


जोवर असेल

खाणारे तेच गाणारे 

प्रेक्षक अन नौटंकी करणारे 

आयुष्याचा तमाशा होणारच


जोवर असेल आम्ही भ्रमात ...

आमची परंपरा सर्वश्रेष्ठ 

केवळ आम्हीच आहोत ग्रेट 

तीच टेंपरेकॉर्डर ( कुठवर? )वाजवणार…


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy