जोकर
जोकर
स्वतःच हासत
दुसर्यांना हसवत होता!
स्वतःच रडत
दुसर्यांना रडवत होता!
त्या क्षणाला
ना तो आनंदी होता
ना तो दुःखी
निर्विकारतेने बघत
हसवत रडवत होता सभोवतालयांना!
कोणी जोकर म्हणत
तर कोणी वेडा
स्वतःच्याच अनुभवाने
लोक त्यालाओळखायचे!
ना त्याला स्वतःच्या ओळखीचे भान
ना त्याला स्वतःच्या हसण्या रडण्याचे भान
स्वतःच्या हसण्या रडण्याने
नकळत भानावर येत होते सभवतालीचे लोक!
