जोडणी....
जोडणी....


सर्व जातींची
सर्व पंथांची
सर्व धर्मांची
सर्व मानवांची ही कर्म भूमी
ही आपली भारतमाता....
अखंड गाते गीत एकीचे
ही इथली जीवनगाथा...
इथे न कसला भेद भाव
इथे न कोणी रंक अथवा राव..
इथे नांदती आंनदाने
ईश्वर अल्ला
आणि
सर्वांचे इष्ट भगवान...
सर्व श्रेष्ठ ही भारत माता
गुंफते एकदिलाने
माणुसकीचे नाते...
हातात हात घालुनी
खुल्या दिलाने राखण्या जगी
ज्वलंत अभिमान...
प्रत्येकाच्या हृदयी ठेऊन
रास्त स्वाभिमान...!