जन्म वाया गेला
जन्म वाया गेला
मरावं लागतच एके दिवशी
तुला, मला नी प्रत्येकाला,
उतु नको, मातू नको
बस्स एवढचं सांगणे तुला.
नको लबाडी, स्वार्थ मुळीच
लुटून घरं भरू नका,
इमान राखून ठेवा थोडे
नको विश्वासघात, धोका.
संग येत नसते काहीच
बस्स, उरते एक ते नाव,
मागुन मिळत नसते मोठेपण
कशाला खायचा उगीच भाव.
झाले भलं तर करा थोडं
वाटोळे कुणाचे करू नका,
दोष नका देऊ दुसऱ्यांना
स्वतःच्याच शोधा चुका.
केली असती मदत कुणा तर
सारे धाऊन आले असते,
कुत्र्यासारखे तडफडून मरण
नी हाल एवढे झाले नसते.
माणूस म्हणून वागावे नी
माणुसकी ची हवी जाण
जन्म वाया गेला सारा
कळलं गेल्यावरती प्राण...
