जन्म बाईचा.....
जन्म बाईचा.....
बाईचा जन्म
खरचंच सोपा नाही
मातीत एकदा रूजल्यावर
उमलून पुन्हा बहरणे
खरचंच सोपे नाही।।१।।
ऋणानुबंधांच्या गुंत्यात
घट्ट गुंतल्यावर
अलगद अलिप्त होणे
खरच सोपे नाही।।२।।
वात्सल्याच्या हिंदोळ्यावर
मस्त निवांत झुलताना
Attachment मधील detachment
शोधणे खरचं सोपे नाही।।३।।
प्रेमाच्या उत्फुल्ल पंखांवर
उंच भरारत असताना
विखारांची धग सोसणे
खरचं सोपे नाही।।४।।
नात्यागोत्यांच्या भावविश्वात
चुक नसता माफी मागणे
ओठ दाबून मुक रडणे
खरचं सोपे नाही।।५।।
अपराध नसता शिक्षा भोगणे
तरीही वरपांगी गोड हसणे
ह्रदयाला पिळवटून घेणे
खरचं सोपे नाही।।६।।
शत्रूला मित्रत्वाने जोडणे
सासर-माहेर कुळांना उद्धरणे
मानापमानांचा हिशोबच नसणे
खरचंच सोपे नाही।।७।।
म्हणूनच म्हणते,
बाईचा जन्म खरचं सोपा नाही
