जल हेच जीवन
जल हेच जीवन
नको शब्दात नको बोलण्यात
असू दे मानवा तुझ्या आचरणात
कर जपून सदा वापर जलाचा
जल हेच जीवन अवघ्या जगात
असू दे जाण तुला भविष्याची
दुष्काळाचा भयानक चटका
घोटभर पाण्यासाठी मुकावे
स्वकर्माचा हानिकारक फटका.
होता नाहीसे जल वसुंधरावर
सर्व जीवीतांना क्षणांत मरण
नको ओढू संकट स्वतःवर
जाणूनबूजून मृत्यू ला शरण
स्वस्वार्थासाठी का ? होईना
थेंब थेंब वाचव तु जलाचा
आदर्श होईल सर्वत्र तुझा
वाटा तुझा हा मोलाचा
मोल जलाचे अमोल सर्वदा
गुणधर्म त्याचा आहे जीवन
थेंबाथेंबात जणु अमृताचा वर
त्यात फुलते जिवितांचे जीवन
केला जलाचा योग्य वापर
न्यारी किमाया होईल धरेवर
हरित स्वर्ग भासेल पदोपदी
बळी नाही जाणार फासावर
करु जनजागृति आपण बांधव
स्वदेशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न एक
जल वाचवा जल हेच जीवन
एकतेच्या बळावर प्रयत्न हा नेक
