STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

जल हेच जीवन

जल हेच जीवन

1 min
271

जल हेच जीवन

अन्यथा होई मरण

पेटायला नको रण

पाण्यासाठी....१

  

गोल गोल राणी 

इतु इतु पाणी 

म्हणत होतो गाणी

पाण्यासाठी...२


कुठे वणवण 

कुठे चणचण 

कुठे उधळण

पाण्यासाठी...३


उन्हाचा मार

डोक्यावर भार

सोसतोय फार

पाण्यासाठी...४


चढता जोर

तुटला दोर

संघर्ष घनघोर 

पाण्यासाठी...५


डोळ्यांत सागर

कमरेला घागर

करतो जागर

पाण्यासाठी...६


अनुभवाचे बोल

विहीरी असती खोल

सांभाळावा लागे तोल

पाण्यासाठी...७


खेळू कोरडी होळी

नको कराया आंघोळी

फक्त ठोकून आरोळी

पाण्यासाठी...८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational