STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

जिवंतपणाचे उदाहरण कविता...

जिवंतपणाचे उदाहरण कविता...

1 min
359

एक बिज रूजवलं मी ,

वाऱ्यावर डोलत दोन पाते दिसले ,

उर भरून आले जेव्हा ,

जमीनीला फाडून अंकूरले ...

कोवळ्या कोवळ्या किरणांनी,

घेतला कधी शुंगार करूनी ,

सांज चढूनी रंगली तिच्या ,

अलवार ओथंबून गाण्यांनी ...

रात्र होता ती विरहात जळली ,

कधी शहारून मिठीत विरघळली ,

चांदण्यात फिरतांना नाहून निघाली,

क्षितीजापलीकडे चंद्रासवे विसावली...

कुठे दुःख सोसुन हळहळली ,

कुठे सुखाची चाहूल दिली ,

कुठे क्रांतीची मशाल पेटवुन,

कुठे निखारे ओंजळीत धरली ...

मुक्यांची अबोल वाणी ती ,

पावसाची रिमझीम रिमझीम तराणी,

माझ्या कवितेचे सामर्थ्य पेलण्या ,

शब्दांची झाली मी दिवाणी ...

ती सांगून येत नाही कधी,

तिच असचं येण भावते मला,

ती येते म्हणून मी हसते ,

जिवंतपणाचे उदाहरण कविता भासते मला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract