STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

जिवंत भविष्य

जिवंत भविष्य

1 min
237

पाहिले आज एक अनोळखी वळण,

रस्ता शोधत भटकत गेले मन.


एक-एक पाऊल चालत पुढे पुढे, 

थबकले माझे मन पाहून हे मडे! 


रांगा होत्या भल्यामोठ्या लागलेल्या, 

अंत्यविधी उरकण्यास मनाने पेटलेल्या. 


पाहून सारे, झाले मनाची लाही लाही, 

देवा, कसे मी तुला मनाने वंदन वाही. 


खरे वाटे आज, शब्द मनास पोखरून जाई,

'एकटा आला जगात, एकटाच परत जाई'!


भल्यामोठ्या विश्वात, जीवन रंगात रंगला;

घटका भरत आली जगानेच निरोप दिला. 


चुकीचे फळ ना वाटले मिळेल असे, 

घडा पापाचा भरला, तेव्हा मरण दिसे.


कोरोनाच्या काळात न कळले ओघात, 

ज्यास घाबरे मन तेच पडले पदरात. 


विनवणी आज जिवंत असणाऱ्यास, 

ठेवा थोडे संयम हरवण्याला कोरोनास. 


पाळा काटेकोर नियम घालून शिस्त मनास.

तेव्हाच कुठे पाहू जिवंत आपल्या भविष्यास!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational