जीवनाचे उरलेले क्षण...
जीवनाचे उरलेले क्षण...
जीवनाचे उरलेले चार क्षण
आता हसत खेळत जगावे
नको ताण आयुष्याचा इथे
फक्त मी निवांत मनाने रहावे ...
ही असते इच्छा प्रत्येकाची
पण सर्वच काही कवी नसावे
निवांतपणा उपभोगायलाही
ऐकटे मन कशात गुंतवावे...
माणुस एक सामाजिक प्राणी
जगणे ऐकटे त्याला नसावे
एक सवंगडी सोबतीला मनाचा
जिवन मोगऱ्यापरी फुलावे ...
