जीवनाचे गुरू
जीवनाचे गुरू
माझ्या जीवनाला
प्रकाश दिधला
माझे माय तात
भाग्य उदयाला...
मार्गातच काटा
पायात बोचला
माय तात यांचा
अश्रू ओघळला ...
माझ्या काळजीत
जीव ओलावला
घास घासातला
नित्य भरविला ...
संस्काराचा गुरू
रूपात लाभला
माय तातां साठी
ताठ कणा झाला ...
इशास प्रार्थना
भाग्योदय व्हावा
त्यांच्या पोटी यावा
जन्म तो पुढला ...
असेच जीवन
सुखमयी यावे
वाटावे जगाला
प्रार्थू इश्वराला ...
