STORYMIRROR

Subhash Charude

Inspirational Others

2  

Subhash Charude

Inspirational Others

जीवन

जीवन

1 min
14.7K


जीवन एक प्रवास, कुणासाठी खास

जीवन एक ध्यास, कुणासाठी त्रास

जीवन एक हव्यास, सुखाचा आभास

जीवन एक रण, सुख दुःखाचे वन

जीवन एक धन, ईश्वराचे ऋण

जीवन एक भेट, मनांचा समेट

जीवनाचे एक रहाट, सुवर्ण पहाट

जीवन एक वाट, जगण्याचा थाट

जीवन एक संगीत, सुख दुःखाचे गीत

जीवन एक प्रित, मनाचे मन मीत

जीवन एक कला आयुष्याची माला

जीवन एक हिरा, पाप पुण्याचा भारा

जीवन एक शक्ती, जीवात्माची भक्ती

जीवन एक आकाश, अनुभवांचा प्रकाश


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational