जीवन
जीवन
असा कुढतोस का रे वेड्या,
बघशिल का जरा चहुकडे ,
जो तो संघर्ष जिंकण्या ,
जीवनी या धडपडे ,,,,,,,,,
चालता चालता पावलाने
आपली वाट शोधली,
झाला गतीशिल त्याने
प्रगती पुर्ण साधली,,,,,,,
अंधकाराला उजळनारा
चंद्रनील तो आकाशी,
काळे ढग तव प्रभेला
अडवतिल ते कुठवरी,,,,,,,
सारून नैराश्य धन रे
जाशिल तु पुढे पुढे ,
थांबला तो संपला रे
भोळा बिचारा भाबडा,,,,,
