जीवन..!
जीवन..!
पाणी म्हणजे जीवन
हे मी अनुभवतोय
पायाला गुदगुल्या होताना
थोडा सुखावतोय
सीमेवर भारत मातेचे
रक्षण करताना
प्रत्येक क्षण मला
समाधान देतोय
खांद्यावरची बंदूक
भार संरक्षणाचा
लीलया साहण्याची
ताकद मला देते
भारत भू मला
सदा सीमेवरही
प्रेमाचे मायेने
आलिंगन देते
जळी काष्टी पाषाणी
भारत भू लाच मी स्मरतोय
तिच्या कृपेनेच मी
हे आनंदी जीवन जगतोय....!!!
जय जवान....💐💐!