जीवन झकास
जीवन झकास
डोईवर आकाश
सोबत सुर्याचा प्रकाश
मग म्हणतोस कशाला
हे जीवन भकास
ठरवले दगडावर तर
हिरवळ उगवशील
कोरड्या वाळूवर
फुलबाग फुलवशील
मनी असू दे रे
यशाचा ध्यास
मन तुझे नेहमी
शांत असू दे रे
कधी कशाची
खंत नसू दे रे
खाशिल तू ही
सुखाचा घास
निराशा कधीही
मनी नसू दे रे
नेत्रात आशेचा
किरण दिसू दे रे
जीवन होईल
तुझे झकास
