जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
प्रवासात या जीवनाच्या किती
ऊन सावल्या येती नानारंगी,
इथे,तिथे अन् चोहीकडे शोध
पण देव वसतो अंतरंगी......
मन निर्मळ,निष्पाप ,हळवे
नांदते सौजन्य,कैवल्य त्यामंधी,
दगडा-धोंड्यावर किती भक्ती
पण देव वसतो अंतरंगी....
आई-बाच्या मनात राहतो
छोटूल्याच्या रडण्यात नांदतो,
निष्पाप अंतकरणी हक्काने
देव अंतरंगी वसतो....
नको वेदना कुणास
दुखवावे ना मनास,
हास्य फुलवता मुखी
देव येतो भेटावयास....
या जन्माचे करू या सोहळे
जाणू अंतरंगातला तो देव,
संवेदनशील बोलणे-वागणे
हीच पुण्याईची असे ठेव....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
