जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
जीवनाच्या प्रवासात
कित्येक भेटती वाटसरू,
सुखी, दुःखी, हसरे-रडके
एक-एक लक्षणांस स्मरू......
देव भेटले कित्येकवेळा
वर्तनाच्या परिघातून,
माणसाची आर्त हाक
ऐकली परिचयातून.....
व्याकूळ होऊन मन शोधी
माणसास माणसातल्या,
सद्विचारांची शिदोरी
सांगे कथा अंतरातल्या.....
तृष्णा शमविणारा असा
खराखुरा माणूस पाहीला,
भुकेल्यास तृप्ती देणारा
माणसातला देव जाणिला.....
कोरोनाच्या संकटात
देवमाणूसच धावला,
नानाप्रकारे साहाय्य करणारा
शोध माणसातील माणसाचा लागला......
