STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
158

  रडत-खडत संगीत

  जीवन एक संघर्ष,

  क्षणोक्षणी होतसे

   सुख-दु:खाचा परामर्श..


   हास्य ओठी फुलविताना

   यातनांच्या पायघड्या,

   जीवनाच्या प्रवाहात

   स्वखुशी तू चाल गड्या..


   मनी कधी लपंडाव असा

   आशा-निराशा पिंगा घालती,

    ओंजळीतल्या सुगंधातून

    भुंगेही नकळत सुटती...


    हासते मी सहज इतके

     अंत दुःखाचा करूनी,

     मन घेई नवी उभारी

    निराशेचा पडदा सारूनी..


    संघर्षाची वाट सदैव

    आसवांनी धुवून जाते,

    यशाचे प्राक्तन फुलता

     क्षण कठीण विसरते....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational